भाऊबीज
भाऊबीज
प्रतीक्षा करुनी भाऊबीजेची
आला सण दारी
मंगलमय तोरण बांधून
करुया दिवाळी साजरी
आस भावा बहिणींच्या
भेटीची ओढ खास...
ओवाळून सोन्याच्या ताटात
सणाचा वेगळाच थाट...
प्रेमाचे बंधन, रक्षणाचे वचन
साजरा करत आला
आपुलकीचा हा सण....
सण सौख्याचा,
प्रेमाचा, विश्वासाचा..
आयुष्यातील या
अतूट नात्यांचा....
दिव्याची वात,
आकाश कंदील प्रकाश..
सारा आसमंत उधळला.
दिवाळीच्या या रंगढंगात...
भाऊबीजेच्या या सणाला
लागली चंद्रालाही प्रतीक्षा
भावा बहिणींच्या नात्यांची
जशी दिवा नी वाती
आहे सदा संगतीला....
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा....