भाषा पाठ
भाषा पाठ
मराठी मुखे म्हणा
मराठी मुखे म्हणा
मातृभाषेची तुलना
कोण करी ... ॥ धृ ॥
सुंदर ही भाषा
उभ्या महाराष्ट्रावरी
राज्य करी हजारो
वर्षापासुनिया ...॥१॥
अमृताहूनी गोड
लागे जिभेवरी
आवडते नेहमी
राही ध्यानी ... ॥२॥
ग्रंथ कथा काव्य गाणी
गोड लागे कानी
कंठात गोडवा
विराजित ... ॥३ ॥
मराठी माणुस म्हणे
हे मराठी चे सुख
गायीनं मुखाने
आवडीने ... ॥४॥
मराठी मुखे म्हणा
मराठी मुखे म्हणा
मातृभाषेची तुलना
कोण करी ...
