STORYMIRROR

Nalanda Satish

Inspirational

4  

Nalanda Satish

Inspirational

भारतीय संविधान

भारतीय संविधान

1 min
746

आलं जन्माला संविधान

बाबांच्या रक्तातून  

शब्दांकुर फुटले रोमारोमांतून

संविधानाच्या प्रत्येक कलमांतून


पाच हजार वर्षाची 

गुलामगिरी संपुष्टात आली

वंशपरंपरा, चातुर्वरण्यांची 

जात मुळासकट उपटली गेली


दंभ वर्चस्वाचा धुळीला मिळाला

बहुजनांना सन्मानाची भाकर मिळाली

तंत्र,मंत्र,होमहवन, यज्ञ निष्क्रिय झाले

बेडयांची गुलामी संविधानांन कापली


समान नागरिक, समान अधिकार

सामाजिक बांधिलकी पक्की झाली

एक राष्ट्र एक जनता एकसंध देश

सर्वधर्मभावाची नाड घट्ट बांधली 


राष्ट्राचा पवित्र ग्रंथ भारतीय संविधान

हेच आहे भारताचे उगमस्थान

असावा प्रत्येकाचा जीव की प्राण 

मिळवून दिला जगण्याचा स्वाभिमान


मूलभूत हक्काची दुधारी तलवार

देशाची आत्मा भारतीय संविधान

अन्यायावर करते सडकून वार

प्राणांहून प्रिय आम्हा भारतीय संविधान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational