STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

2  

Meenakshi Kilawat

Inspirational

भारत घडविला

भारत घडविला

1 min
202

पारतंत्र्याचे तोडूनिया पाश 

बाळ गंगाधर टिळकांनी

बलिदानी थोर पुरूषांच्या

आज करू या आठवणी।।


लोकशाहीर व साहित्यिक 

आण्णाभाऊ साठे यांनी आज

भारताला शिकविला साहित्य ज्ञान 

स्वाभिमानी रत्न झालेत महान

देशाच्या सुपुत्रांचा बाळगू अभिमान


ज्यांनी भारत घडविला

देशार्थ देह परी ते झिजले

शौर्याचा रंग केशरी हा

शौर्याच्या तेजाने लकाकले


ज्यांनी भारत घडविला

देशसेवेत प्राणाची आहुती

कर्तव्यगंधाने फुलुनी येती

वीरांची अफाट किर्ती


दिले वीरांनी हसुनी प्राण

गुंफुनी भावना या अंतरी

आठवावे थोर पुरूषांना

गगनात वसती तारका रूपेरी


वीर वर्णितांची महत्ता 

कर्तव्याने फुलुनिया देशभक्ती

विश्वात जागवाया हृदयात

भरावी दैवी विवेकशक्ती


कर्तव्यनिष्ठ होते धुरंधर 

त्यागाची असे ज्वलंत मूर्ती

देशाला जीवनाची अमूल्य

भेट देवुनी तरले तिर्थी


देवू या मनातुनी पुण्यतिथीला 

या अनुपम विभूतींना स्थान

श्रद्धांजली देवून शपथ घेवू या

ठेवू आदर्श संस्कृतीचा मान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational