Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Usha Dhere

Inspirational

2  

Usha Dhere

Inspirational

भारत देश महान...

भारत देश महान...

1 min
160


भारतभूच्या क्रांतीचे,गाऊ गौरव गान

भारत देश महान अमुचा,भारत देश महान...||१||


स्वातंत्र्य मिळवण्या,किती झगडले

रक्त सांडले,वार झेलले,

देशासाठी प्राण अर्पिले,

गाऊ त्यांचे गान,भारत देश महान अमुचा......||१||


टिळक,नेहरू,गांधी,यांच्या

गाऊ गाथा पराक्रमाच्या,

बलिदानाने पावनभूमी

करूया त्यांना प्रणाम,भारत देश महान अमुचा.....||२||


देशासाठी हुतात्मे झाले

स्वातंत्र्य मिळवण्या फासावर चढले

त्या शूरवीरांच्या चरणी अपुला

ठेवूया देह गहाण, भारत देश महान अमुचा.....||३||


आठवूया देश क्रांतीच्या ज्वाला

अबाधित देश ठेवण्या अपुला

जातीभेदाच्या तोडून शृंखला

जागवू या आत्मभान,भारत देश महान अमुचा......||४||


एकता आणि एकात्मतेचे

घडवू दर्शन देशभक्तीचे

जाणीव ठेवू क्रांतिगाथेचे

गाते उषा हे गान,भारत देश महान अमुचा......||५||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational