Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Pawar

Inspirational

1.0  

Chandan Pawar

Inspirational

कायदा

कायदा

1 min
393


कायद्याकडून न्याय म्हणजे

ओरडून मारलेल्या बोंबा ;

लुळे-पांगळे कायदे

अडचण नसून खोळंबा.


वाटा-पळवाटा शोधून

होतोय रोज कायदेभंग;

चोरांबरोबर सवांकडूनही

नेहमीच कायदा तंग.


कायदा वाकवायला-तोडायला

आपण रोज इथे सज्ज ;

तरीही भारत कसे काय

हो 'कायद्याचे राज्य'.


आजही आपण पारतंत्र्यात

असल्याचीच धारणा ;

कायदेभंग चळवळीची

स्वातंत्र्यांनंतरही प्रेरणा.


सगळंच कायद्यानं थांबत

नसलं तरी कायदा हवा ;

कायद्याने बळ मिळून करतो

जो-तो न्यायदेवतेच्या धावा.


कायदा केला तरी तो

नसावा लुळा-पांगळा ;

जाती-धर्म , व्यक्तिनिरपेक्ष

राष्ट्रहित जपणारा आगळा.


Rate this content
Log in