भार
भार
वाणी असावी प्रेमळ
नको तलवारीची धार
शब्द वापरा जपून
नको बोलण्याचा भार||१||
जोडावे ह्रदय प्रेमाने
नको हेळसांड शब्दांची
कठोर शब्द तोडती
नाती जन्मोजन्मांची||२||
शब्द वर्मी घाव घालून
करती वेदना मनाला
भार शब्दांचा सोसेना
यातना होती सर्वांगाला||३||
करावा हात पुढे सदा
आपुलकीचा नसे भार
जपा नाती अखंडित
खोलून मनाचे द्वार ||४||
कशाला मानावा भार
आयुष्याची ही शाळा
आनंद मिळवित सारे
उत्साहाने इथे खेळा||५||