बेटी
बेटी
प्रिय आई- बाबा तुम्हांस
माझे शतशः नमन..
देवाच्याही आधी नित्य
तुमच्या रूपाचे स्मरण..
तुमच्यातच भासे मज
पंढरीची "विठू- माऊली"..
आई, तुझ्यासम होईन
मी घराची सावली..
भेदभाव केले नाहीत
मुला-मुलीस ठेवले समान..
"बेटी-धनाची पेटी" असे
गायिले सदा गान..
तुम्हांस मी वचन देते
मार्ग चुकीचा धरणार नाही..
तुमचे मस्तक झुकेल
असे कर्म करणार नाही..
मी शिकेल शाळा खूप
उंचावेल तुमची मान..
"मेरी बेटी- मेरा अभिमान"
उक्तीसम वाढवेल तुमची शान..