बेसन लाडू
बेसन लाडू
बेसन लाडू...!
बेसन लाडू गोड गोड
दिवाळीचा खास मेनू
चला पाहूया डोकावून
कसे याच्या निर्मितीचे अणूरेणू...
खमंग मोठ्या स्वादाची
बेसन भाजणी तुपावरची
युती करावी त्यात प्रेमाची
हळुवार पणे पिठी साखरेची..
काजू बदाम तुकडा
हवा तर वापरा सुका मेवा
वरकरणी सौन्दर्याची किमया
साधावी लावूनी बेदाणा एक नवा...
हातात घोळवुनी गोलगोल
लाडू वळावा भराभरा
मधूनच चव चाखण्या
तोंडात टाकावा जराजरा..
दिवाळीचा फराळ राजा
देखणा दिसतो फराळाच्या तबकात
चव लागता जिभेला खमंग
रेंगाळतो मधूर स्वाद तोंडात...
कसा असावा बेसन लाडू
जाणते प्रत्येक सुगरण
दिवाळीच्या गोड सणाची
हीच खरी मौलिक शिकवण....!
