Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pappu Tekale

Inspirational Others

4  

Pappu Tekale

Inspirational Others

बदलत्या महाराष्ट्रा

बदलत्या महाराष्ट्रा

1 min
358


बदलत्या महाराष्ट्रा बदलत्या महाराष्ट्रा....

इतिहासाची साक्ष देऊन भूगोलाला साज चढवुनी...

पडू नाही दिला कधी तुझा रे फेटा...

बदलत्या महाराष्ट्रा बदलत्या महाराष्ट्रा....!!धृ!!


इथे जन्मला ज्ञानियाचा तो राजा खरा...

इथेच गायली ती मुक्ताई ताटी उघडा ज्ञानेश्वरा...

एकनाथ संत झाले वेद शिकविले ते शुद्रा...

तहानलेल्या प्राण्यालाही पाजणारा काशीच्या तिर्था...

नामदेव इथे जन्मले शिकविला मानवधर्म खरा...

कीर्ती किती रे लिखाणाची पंजाब आतही भक्तीचा वारा...

तुकोबाची अभंगवाणी दूर करीत या तिमिरा...

सांभाळली ती या राष्ट्राची पडलेली संताची धुरा...

बदलत्या महाराष्ट्रा बदलत्या महाराष्ट्रा....!!1!!


सह्याद्रीच्या कडेकपारीत दौडला शिवाजीचा घोडा...

कसा विसरणार पडलेला तो संभाजीचा रक्ताचा सडा...

ताराबाईने कसा दिला रे दुश्मनाला त्या वेढा...

अहिल्येला जन्म दिला तू सुटला होळकराचा तीढा...

बाजीराव तो शूरवीर दिल्लीवर ही फडकविला झेंडा...

महादजीने प्रयत्न केला घेण्या पानिपतच्या सुडा...

नाना फडणीस पेशवा झाला दिला पेशवाईचा धडा...

राघोबा तो कपटी निघाला गेला पेशवाईला तडा...

विसरू नको रे बदलताना झालेली त्यांची हाल-अपेष्टा..

बदलत्या महाराष्ट्रा बदलत्या महाराष्ट्रा....!!2!!


वासुदेव फडके झाले ते इथे आद्यक्रांतिकारक...

प्लेग कमिशनर रॅन्डला मरणारे बंधू चाफेकर...

तुझ्याच कुशीत जन्मले येथे स्वातंत्र्यवीर सावरकर...

केला वध त्या जॅक्सनचा नाव त्याचं अनंत कान्हेर..

असंतोषाचे ते जनक टाकला कसा रे बहिष्कार...

सेनापती बापट झटले रे ते गाव त्यांचं ते पारनेर...

खपून नाही घेतली जाणार झालेली ती तुझी चेष्टा...

बदलत्या महाराष्ट्रा बदलत्या महाराष्ट्रा....!!3!!


काळजाचे भाग करावे तसे केले रे तुझे किती भाग...

पुन्हा जन्मलास दिवस तो एक मे एकोणीसशे साठ...

तुझ्या आंदोलनात हुतात्मे झाले रे ते एकशे सात...

किती बदललास रे तू यांचेच शौर्याचे गाणे गात...

अपुरी पडली माझी कविता तुझं सार मांडण्यात...

इतकी केली तुझ्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा...

बदलत्या महाराष्ट्रा बदलत्या महाराष्ट्रा...!!4!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational