बदलते जग
बदलते जग
कोरोनानंतरचे आयुष्य
बदलेल आजचे सारे जीवन,
टिकाव लागण्यास भविष्यात
बळकट करू या व्यवस्थापन.
माणसातील नात्यांपासून
देशातील संबंधापर्यंत,
संकेत मिळत आहे सर्वत्र
बदलेल जग लागेल शर्यत.
वेळ आली आज
घरून काम करण्याची,
शिक्षण ही झाले सुरु
घरात बसून शिकण्याची.
बदलत आहे वेग
माहितीच्या प्रसारणाचा,
शिखरावर पोहोचला
बदल आधुनिक तंत्रज्ञानाचा.
संवाद संपले समूहातले
देवाणघेवाण वर ही बंदी,
बदलेल सारे जग हळूहळू
कोरोना महामारीत येईल मंदी.
