बचत
बचत


तू नेहमी हसायचास माझ्या
आजीच्या बटव्याला
त्यात साठवून ठेवलेल्या
चिल्लर पैशाला
मी मात्र हसून घालवायचे
तुझे खोचक बोलणे
कानाडोळा करायचे
तू मारलेले टोमणे
महिनाखेर उजाडली की
आपसुक बाहेर निघायचं
बटव्यातल्या चिल्लरला
आपोआप पाय यायचं
महिना कधी संपला ते
कळायचंच नाही
हसणारा नवरा मात्र
माझी हुशारी पाहात राही
बचत होती पाठीशी
म्हणून आजवर तरलो
मोडका तोडका संसार
आम्ही बिनघोर सावरलो