बैलजोडी
बैलजोडी
ढवळी-पिवळी माझी बैलजोडी,
शेत-मालाने लबा-लब पिकवते वाडी.
माझी आन व शेताची शान बैलजोडी,
शेतक-याचा खरा मित्र असते बैलजोडी.
बैलजोडी ओढते माझ्या संसाराची गाडी,
तीच्या मदतीला असतो मी, नांगर व बंडी.
निष्पळ जमिन बनवते सकस हीच जोडी,
शेतक-याचा कामधेणु हीच बैलजोडी.
विश्र्वात शेतक-याची ओळख अन्नदाता,
पण बैलजोडी हीच अन्नदाताचा भ्राता.
शेतक-याच्या कुटुंबाचा कणा म्हणजे भ्राता,
कृषि युगापासुनच निभवत आहे मित्रता.
कृषि युगाचे वाहन होते बैलजोडी जुण्याकाळी,
संकृती, नाते टिकवते बैलजोडी वेळो-वेळी.
बैलाच्या सम्मानाचा सण पोळा करतो राजा-बळी,
गृहिणी प्रेमाने भरवतात बैलांना पूरण पोळी.
