बावरी ही प्रीत...
बावरी ही प्रीत...
बावरी ही प्रीत तुझी नि माझी ,
जोडी जणू राधा अन् कृष्ण जशी...
राधा कृष्ण का नाही कधी एक झाले
प्रेम मात्र त्यांचे अमर जाहले
प्रेमाच्या हिंदोळ्यावर झुलायला तुझ्यासोबत ,
येते मी लढून सगळ्या जगासोबत...
असता सोबत तुझी ,
ना मला पर्वा जगाची
तुझ्या मीठीचा आभास ...
आहे माझ्यासाठी खरंच खूप खास...
दूर कितीही गेलास तरी
गुर्फटतो श्वास तुझ्यात
प्रेमाच्या त्या आणाभाका ,
घेतल्या प्रेमाच्या ओढीने
एकरूप झालो आपण
त्या गुलमोहराच्या साक्षीने
अंकुर माझ्या उदरात वाढला
पण माझ्यासवे तू तो अनुभवला...
मरणकळा मी सोसल्या
पण डोळ्यातून तुझ्या त्या झळकल्या ...
जन्म नव्या जीवाचा पण आपणही नव्याने तेव्हा जन्मलो ...
बावऱ्या या आपल्या प्रीतीला पुन्हा एकदा नव्याने जगलो...
बहरत मग गेली प्रीत ही अजुनी ...
तुझी नि माझी ओंजळ कधी रीती ना राहिली
वेलीवरच्या फुलांनी झाले आपले आयुष्य सुगंधी...
चिव चिवनारी पाखरे बघून होत राहिलो आनंदी...
घरटे होऊ लागले हळूहळू अजुनी सुंदर आणि सुबक ...
सोबत फुलत राहिला आपला लाडका तो गुलमोहोर ...
केसांमधल्या चंदेरी छटा दिसू लागल्या एकमेकांना...
प्रेम आपले परिपक्व झाले ही देऊन सुंदर भावना...
पिल्ले लागली आता उडू , आकाशात मोठी भरारी लागली घेऊ ...
घरटी आता शांत झाली...चिव चिव ती थांबली ...
आता सुरू झाली खरी खंत ...
तुझ्या माझ्या संसाराचा जणू होऊ लागला अंत...
झाडांवरची सुंदर फुले आणि किलबिलाटाने पक्षांच्या...
पुन्हा एकदा पडलो आपण प्रेमात एकमेकांच्या...
जुने सगळे दिवस ते रंगीत...आता पुन्हा अनुभवायचे...
एकमेकांच्या साथीने जीवन सुंदर जगायचे...
बहरणारा तो गुलमोहर आहेच पुन्हा सोबतीला...
चंद्र सूर्यही कुठे गेलेत सोडून आपल्याला ...?
बावरी ही प्रीत आपली ...
हृदयाच्या कप्प्यात होती जपलेली...
आज तिच्याच साथीने...
सारे पुढचे आयुष्य बहरेल आनंदाने...!
