माझ्या जीवनातले गुरू...
माझ्या जीवनातले गुरू...
आई असते पहिली गुरू ...
जीची शिकवणी अगदी असते शेवटपर्यंत सुरू...
आपला गाईड नेहेमी सोबत असणारा ..
कुठल्याही समस्येचा तोडगा नक्की देणारा...
मग जीवनाच्या वाटेवर भेटत जातात अनेक गुरू ...
बाबा , दादा ,ताई लहान भावंडांची शिकवणीही होते सुरू ....
शिक्षक तर अनेक असतात द्यायला शिक्षणाचा आधार ..
सोबतच देतात अनेक चांगले विचार ...
मोठा शिक्षक तर नेहेमी असतो आपला सखा सोबती ...
मित्र मैत्रिणी , सखे सोबती आणि काही विशेष नाती ....
मुलीसाठी तर सासर हे मोठेच ठरते गुरुस्थानी...
सगळेच काहीतरी शिकवून जातात प्रत्येक क्षणी...
सगळ्यात मोठं स्थान आहे आपल्या काळजाच्या तुकड्याचं ..
करण सगळ्यात मोठं शहाणपण मिळतं आई होण्यातून .
माझ्या जीवनात अनेक वाटेवर भेटलेल्या माझ्या सगळ्या गुरूंना समर्पित ...
