Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Smita Bhoskar Chidrawar

Others

3  

Smita Bhoskar Chidrawar

Others

सोनेरी सकाळ...!

सोनेरी सकाळ...!

1 min
248


सूर्याचे उगवणे म्हणजे दिवसाची सुंदर सुरुवात 

पाने फुले आणि चाराचरही होतो प्रसन्न तेजाने ,

फुलपाखरे ही देती प्रीतीने साद .

सूर्याचे हे पहिले किरण उजळती रोजच सृष्टी नव्याने .


तेजाची आभा जशी भासे सोन सकाळी ,

सृष्टि नहाते रोज नव्या रंगात ,

सुंदरही भासे सारी दुनिया रोज सकाळी.

पण साजिरी भासे फक्त कोवळ्या उन्हात .


प्रसन्न दिसती दाही दिशा सोनेरी किरणांत ,

फुलपाखरे सतरंगी, फुलेही अनेकरंगी ,

पाने , फुले आणि पक्षीही स्वच्छंदी आकाशात .

आणि दिसते आकाशही रंगीबेरंगी .


दिवसाची ही सुरुवात होते नेहेमीच रवी किरणांनी प्रसन्न ,

डोळे भरुनी पहावे हे सुंदर जीवनाचे रूप ,

सृष्टीचे हे अनोखे रूप पाहुनी होते मन थक्क .

परमेश्वराचे त्यासाठी आभार खूप खूप .


Rate this content
Log in