#MyDadMyHero#परमेश्वराचा अंश
#MyDadMyHero#परमेश्वराचा अंश
संकटात सावरणारा अर्जंट ब्रेक म्हणजे बाबा...
कायम हक्काची बँक म्हणजे बाबा...
दुःखाचे डोंगर तोडणारी क्रेन सुद्धा बाबाच...!
मुलाच्या जन्मानंतर नव्याने जन्मते ती व्यक्ती म्हणजे बाबा...
परमेश्वराने आपल्यासाठी निर्माण केलेला त्याचा अंश असतात हे बाबा...!
भल्यासाठी शब्दांचे कडू डोस देणारे डॉक्टर ही बाबा...
संघर्षाच्या काळात योग्य दिशा दाखवणारे शिक्षक सुद्धा बाबा...!
अथांग सागर प्रेमाचा असतो बाबा...
प्रवाहा सोबत संकटे वाहून नेतात हे आपले बाबा...!
प्रसंगी कधी रौद्र रूप घेऊन शिकवण देणारे बाबा...
आपल्या पोटातील सगळा खजिना मुलांना देऊन टाकणारे असतात हे बाबा...!
मुलांच्यात स्वतःच आयुष जगतात हे बाबा...
प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिवाचं रान करणारे असतात आपले बाबा...!
प्रत्येक मुलासाठी एक हक्काचा आधारस्तंभ असणारे हे बाबा...
माझ्यासाठी खरच एक अमोल ठेवा आहेत माझे बाबा...!
