STORYMIRROR

Smita Bhoskar Chidrawar

Others

3  

Smita Bhoskar Chidrawar

Others

माझी माय मराठी

माझी माय मराठी

1 min
157

नाळ जोडली गेलीय माझी ,

माय माऊलीशी ...

जन्म भूमीशी ...

आई मानते मी त्या माझ्या मराठी देशाशी !


जावे लागले दूर जरी ,

मन आहे जोडलेले या मातीशी!

जरी वाढले अंतर तरीही ,

जीव गुंतला याच धरणीशी !


झेप जरी घेतली,

निळ्याभोर आकाशात ,

भरारी जरी थोडी घेतली उंच ,

नाळ जोडली मायभूमीच्याच बाहुपाशात ...!!


देश आपला ,

आपलाच वाटला ,

परदेश जरी अनेकदा पहिला ,

बंध मातीशी या कधी ना तुटला !


सुख शोधत शोधत ,

भटकले दाही दिशांना

परी जाणवले सुखहे लपले आहे ,

माय भूमीच्या वांदित चरणां...!


Rate this content
Log in