एक आधारस्तंभ!
एक आधारस्तंभ!
बाबा , पप्पा , डॅड ...पप्पू , बाबू ,अस काहाही म्हणावे लाडाने ,
पण नेहेमीच उभे असतो आम्ही तुमच्या आधाराने...!
देवाचा अंश जो असतो नेहेमी सोबत...
रागातही भरलेली असते ज्याच्या आपलीच काळजी सतत...!
प्रेम ज्यांचे अथांग सागरासारखे...
ना कधी आपण ज्याला होऊ पारखे...!
नेहेमी राहिलात माझा आधार !
कसे मानू मी हे उपकार....
स्वप्न होती माझी पण जगलात ती तुम्हीही...
ती पूर्ण करण्यात आहात बरोबर नेहेमी !
प्रेमात तुमच्या ताकद भरपूर ....
ना राहिली कशातच कसूर !
महती वर्णावया शब्द ना पुरे ....
ऋणातच राहीन तुमच्या जीवन सारे !
शिकवण तुमची आहे जन्माला पुरणारी...
वेळोवेळी मार्ग दाखवणारी !
महती वर्णावया शब्द ना पुरे ...
ऋणातच राहीन तुमच्या जीवन सारे ....!
प्रेमातून करू नका कधी मला मुक्त...
सदैव आनंदी राहा तुम्ही फक्त...!
माझ्या आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक ' बाबा 'ला समर्पित....!
