वसंताचे आगमन
वसंताचे आगमन
रम्य प्रभा अवतरली
प्रसन्न झाली अशी धरा
सोनेरी किरणांची बरसात
वसंत फुलला आता खरा
फुलांचे ताटवे साऱ्या
आसमंतात दाटले
सुर्याची किरणे अन्
वसुंधरा कसे भेटले
मनोहर नजारा झाला
नटली सारी सृष्टी
आसमंतावर झाली
आनंद उत्साहाची वृष्टी
नभात झाली रंगांची उधळण
सृष्टीने रेखिली सुंदर नक्षी
आनंदाने विहरती सारे
स्वच्छंदी पशू आणि पक्षी
चोहीकडे पसरली हिरवळ
पाना फुलांनी धरती सजली
वसंताचे होता आगमन
वसुंधरा आनंदात भिजली...
