Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjana Kamat

Tragedy

4  

Sanjana Kamat

Tragedy

बाप्पांंचे मनोगत

बाप्पांंचे मनोगत

1 min
368


मी गणराया हो बोलतो,

माझ्या स्वागता जो तो लढतो.

माझ्या नावाने राजकारण शिजवतोय.

माझ्या नावाखाली पार्टीचा उदो उदो करतोय.


लोकमान्य टिळकांनी स्वातत्र्यपूर्वकाळी,

माझ्या उत्सव केला जनजागृतीसाठी.

जनतेला एकत्र एकजूटीने येण्यासाठी.

गुलामगिरीतून देश मुक्त करण्यासाठी.


आज कालचा उत्सव पाहून मी रडतो.

बॅन्जोवर मोठ्या आवाजात गाणी लावतो.

नाचून, नको तितका धिंगाणा हा करतोय.

तरूण व्यसनीधिन होऊन झिंगतोय.


निसर्गाशी खेळ खेळतोय,

अवाढव्य मूर्ती बनवून मिरवतोय.

झाडे तोडणेच फक्त करतोय,

जग बुडीला आमंत्रण हा करतोय.


माझे पूर्वीचे दिवस चांगले होते,

खरी श्रद्धा भक्तीने सारे पूजत होते.

सखे भावभावंडे रक्ताचे नाते विसरतोय.

माझे गुणगाणे ही विसरतोय.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy