भाकरीचे स्वप्न
भाकरीचे स्वप्न


रातच्याला मला सपान पडले होते,
अन भाकरीला पाय फुटले होते...
आली चालत चालत अन पडली माझ्या झोळीत,
दीड वर्षाचं लेकरू माझं बसलं होतं खेळीत...
उन्हाच्या झळीपेक्षा जास्त धुमसत होती पोटातली आग,
भुकेने व्याकुळलेल्या लेकराचा कसा करू मी रागाराग...
त्याच भाकरीचे दोन घास पडल्यास अश्रू त्याचे सुकले होते,
त्याला शांतपणे निजताना बघून पोट बी माझे भरले होते...
तेवढ्यात मेली आली ही जाग,
सपान तुटले अन कळले भाकरबी झाली महाग...