घन दाटून येण्याआधीच...
घन दाटून येण्याआधीच...


खिडकीतून रोज बाहेर डोकावण्याआधीच
मन उंबरठा ओलांडायचं
आपला चातक होण्याआधीच
आता येईल एक सर उगीच स्वतःला समजावायचं
घन दाटून येण्याआधीच
मन तुझ्या आठवणींनीच दाटून यायचं
वरून सर कोसळण्याआधीच
डोळ्यातलं पाणी ओघळतं व्हायचं
वीज आभाळी लकाकण्याआधीच
तन अवचित शहारायचं
मेघ दणाणून गरजण्याआधीच
अंतःकरण उगाच आक्रंदू लागायचं
वारा बेलगाम वाहन्याआधीच
काळीज सैरभैर व्हायचं
मातीचा गंध दरवळण्याआधीच
मन खोल विचारात गुरफटायचं
पुन्हा असं काही होण्याआधीच
स्वतःला कसंतरी सावरायचं