काव्यांगण
काव्यांगण
काव्यागंण उजळती
लाख ज्योती लेखणीत
शुभ्र प्राजक्त बहर
रोमरोमी फुलवीत
रम्य स्वर्ग हळूहळू
अष्ट दिशा प्रांजळीत
बीज क्रांतीचे पेरत
शब्दवीर झंझावीत
तेज:पुंज अनमोल
ऋण जगाचे फेडत
धूप सुगंधी वाटत
देहभान विसरत
रंभा उतरे उर्वशी
तारे साज शृंगारात
दिव्यत्वाचे हितगुज
ज्ञानकुंभी भविष्यात
सत्य प्रकाश शिंपत
हित समाज रक्षण
दिपोत्सव कोहिनूर
अलौकिक पखरण
