बाप्पाचा प्रसाद
बाप्पाचा प्रसाद
बाप्पाच्या प्रसादात मोदकाला मान!
विविध त्याचे प्रकार छान!
कधी तळणीचे तर कधी उकडीचे!
सारणात दडलेला खाद्यांनी
मोदकाला मिळतात नावे विविध!
पुरणाचे सारण भरले आत!
'पुरणाचा मोदक' मिळाले नाव छान !
चॉकलेटचे सारण भरले आत!
'चॉकलेटचे मोदक' मिळाले नाव छान!
तीळ गुळाचे सारण भरले आत!
'तीळगुळाचा मोदक' मिळाले नाव छान
गणपती उत्सवात प्रसाद मोदकाचा !
असतो रोज नव नविन सारणांचा मोदक!
असते कधी स्पर्धा प्रसाद बनवायची!
मिळते बक्षिस चविष्ट सुबक मोदक
बणवणार्या सुगरणीलाच खास!
