STORYMIRROR

Sunil Khaladkar

Drama

3  

Sunil Khaladkar

Drama

बाप्पा..... सर्वांचा

बाप्पा..... सर्वांचा

1 min
125

मंदिरात अन अंतरात,

 तोच आहे नांदतो....

खऱ्या भक्ताच्या समस्या,

तोच आहे जाणतो......


रिकाम्या हाताने कोणाला,

तो कोणाला पाठवत नाही.....

नवसाच्या नावाने आलेली भेट,

तो स्वतःकडे मात्र साठवत नाही...


गरीब-श्रीमंत, काळा-गोरा ,

हा भेद त्याच्याकडे नसतो...

म्हणूनच साऱ्या विश्वाचा,

तो पहिला मानकरी असतो....


अनेक रूपात येऊन तो,

भक्तांचे प्राण वाचवतो....

जन्म-मरण आणि सुख दुःखाची,

खेळी ही तोच रचवतो....


काही दिवसांसाठी बाप्पा,

कोणाकडे येत नसतो.....

डोळे मिटून पहा मित्रांनो ,

तो आपल्या हृदयात कायमचा बसलेला असतो...


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Drama