बाप्पा आले
बाप्पा आले


बाप्पा आले आमच्या दारी
विराजमान झाले मखरामधी
अवधी भोवती गणरायाच्या ताटे भरली फुलांनी आणि मोदकांनी
सुगंध दरवळला भक्तीचा चोहोबाजूंनी
परिसर घुमू लागला तुझ्या जय जय कारानी
कोरोनाची आता खैर नाही खूप हैदोस घातला कोरोनानी
अवतरला घरोघरी विघ्नहर्ता विघ्न रोखण्यासाठी
विघ्न कोरोनाचे दूर होईल संकटाची काळी छाया निघून जाईल
विनवणी तुला एकच देवा कोरोनाची सावली संपून दे
निरोगी आरोग्यासाठीची किरणे येऊ दे अनंत चतुर्दशीच्या पहिली