बापाची महती
बापाची महती
मातेची महती | त्रैलोक्यात ख्याती
बापाची महती | अज्ञातचि (1)
नाही गाजावाजा | अंतरीची माया
कौतुकाची छाया | अखंडित (2)
ध्यास मुलांसाठी | अर्थाजनासाठी
गुंतवणूकीसाठी | सदा दक्ष (3)
मुलांत अपूर्ण | स्वप्ने साकारतो
सदाचि झटतो | निरपेक्ष (4)
मुलगा-मुलगी | समानचि मानी
दोघांनाही ज्ञानी | करीतसे (5)
चैन , मौज , मजा | देतसे सोडून
मुले घडवून | सार्थकता (6 )
लेकीच्या लग्नात | होतो नारायण
काढतसे ऋण | हौसेपायी (7)
मुलाच्या संसारी | इदं न ममचि
आहे ते सर्वचि | अर्पितसे (8)
कृतकृत्य होई | समाधानी राही
संध्याछाया पाही | आनंदाने (9)