STORYMIRROR

jaya munde

Inspirational

3  

jaya munde

Inspirational

बाप

बाप

1 min
235

 आयुष्याच्या परीघास

वळण उचित देणारा,

ममतेचा पदर अतुट

पण पडद्याआड राहणारा....


बाप असतो अंतरात

सुखद झुळूक बनूनी,

त्याच्या कष्टाची पर्वा

सुख सारं त्यागूनी...


लेकरांच्या सुखासाठी

काय,काय सहन करतो,

राब-राब राबून कधी

लाचार होऊन जगतो...


तुझा,माझा ,त्याचा

बाप हा बापच असतो,

वेदनांतही हसून जगणारा

तेजस्वी काजवा असतो...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational