बाप
बाप
कुणी बाबांचा बाप केला
कुणी पप्पांचा पाॅप केला
कुणी श्रीमंतीत फादर केला तर
कुणी गरीबीत म्हातारा केला
तरी माझा बाप बापच राहिला.....१
कुणी सिघारेटच्या धुरात
बाप उडवला तर
कुणी पार्टीच्या गार वार्यात
बाप नाचवला
कुणी लबाडीच्या घबाडीत
बाप लपवला तर
कुणी खोट्या अश्वासनांत
बाप कातरला
तरी माझा बाप बापच राहिला....२
कुणी दारुच्या बाटलीत
बाप बुडवला
कुणी कर्जाच्या ढिगार्यांवर
बाप तुडवला
कुणी मटक्याच्या पत्त्यात
बाप पिसला तर
कुणी नशेच्या धुंदीत
बाप विकला
तरी माझा बाप बापच राहिला....३
कुणी चोरट्या हव्यासात
बाप बाटवला
कुणी उधळलेल्या लाजेत
बाप उतरवला
कुणी खोट्या ऐटीत
बाप रुतवला
कुणी खोट्या पदवीत
बाप पचवला
तरी माझा बाप बापच राहिला....४
कुणी जळणार्या त्या घरात
बाप जाळला तर
कुणी कोसळणार्या पावसात
बाप भिजवला
कुणी भल्या वावटळीत
बाप धाडला
कुणी दुभंगलेल्या भूईत
बाप गाडला
तरी माझा बाप बापच राहिला
तरी माझा बाप बापच राहिला...५
