STORYMIRROR

Prathmesh Bansod

Abstract

3  

Prathmesh Bansod

Abstract

बाप

बाप

1 min
535

आईच्या या वेदनेने पुढे का विसरले बापाला ,

सांगा त्यांचे उपकार का विसरले सांगायला.

आई होती घर माझं बाप त्याचा पाया

पायाच ढासळला तर घराचा होईल चुराडा.

आईच्या व्यथा पुढे का विसरले बापाला


आईने नऊ महिने वाढवले मला गर्भाला ,

आई विव्हळत होती वेदनेने माझा बाप कोठे होता,

माझा बाप कोठे होता

देव हळूच म्हणतो तुझा बाप तुझ्यासाठी,

माझ्याजवळ भीक मागत होता


का कळत नाही बापाचे महत्व

आई मागते सुखी ठेव माझ्या बाळाला तर

बाप मागतो माझेही आयुष्य दे त्याला


आई च्या दुःखामध्ये नव्हते कोणी सात फक्त होता

तिथे उभा माझा बाप सात होती बापाची

म्हणूनच आई लढली जगाशी

आई भरवत होते मायेचा घास त्यासाठी


कष्ट करणारा होता माझा बाप

होता माझा बाप

माझ्या लग्नाच्या दिवशी रडली माझी आई

आई चे रडणे दिसले त्या बापाच्या काळजाचा आवाज का नाही ऐकला

तो मनातल्या मनात रडत होता सुखी ठेव माझ्या चिमणीला

देवापाशी मागत होता देवापाशी मागत होता


त्याचे थोर उपकार काविसरले सांगायला सुखी ठेव देवा म्हातारपणात माझ्या बापाला

आई आहे झरा तर बाप हा त्यावरचा पाण्याचा थरा

पाणीच नसेल तर आटेल तो झरा

अभिमानाने सांगते बाप असे जिथे

मान मिळेल आईला तेथे


सशक्ती होती बालपणात आम्हा पाच भावंडांना

संसारात लागल्यावर कळाले बरंका

ती सक्ती नाही तो तर मार्ग होता जीवन जगण्याचा

म्हणूनच टिकलो आम्ही या जगात

हे सांगायला काय विसरले मी तुम्हाला


आईच्या वेदनेने पुढे का विसरले बापाला

दादा म्हणतो आम्ही बापाला

दादा तुम्ही होतात म्हणून आल्या आमच्या

जीवनाला आकार

का विसरले मी तुमच्याबद्दल सांगायला

आईच्या वेदने पुढे का विसरले बापाला

का विसरले बापाला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract