व्यसन
व्यसन
असे कसे व्यसन लावले रे तू,
घात केला तुझ्या या जिवाचा.
जीव रे मोठा अनमोल तुझा,
क्षणातच मातीमोल केले आयुष्याला.
आयुष्यात आला होता जगण्यासाठी,
काहीतरी करण्यासाठी.
सगळेच सोडले तू वाऱ्यावर,
निघालास तु जाण्यासाठी.
शब्द हे तुझ्या दारूचे होते,
दोष मात्र तुला लागला.
निर्णय हा तुझा होता,
वनवास मात्र त्या माऊलीला आला.
लोक म्हणतात दुःख हे वाईट असते,
पण तेच तू कायमचा तिला देऊन गेला.
तिचे दुःख ती सांगेल तरी कुणाला,
व्यसनधीन होता तु पण तिच्या मनातला राजाच होता.
सगळेचजन बदलले तर होत नाही काही त्रास ,
पण तुझ्या या स्वभावामुळे तिला खूप झाला वनवास.
का केले असेल तू काही असेल तुला कारण,
पण जीव तुझा गेला फुकट.
तुझ्या जीवावरती होतास का तुझाच अधिकार ?
माय बाप तुझे पडले रे उघड्यावर.
नशे नशेमध्ये केले खूप कठीण काम,
आयुष्यभर त्या लेकराच्या डोक्यावर नाही राहिला तुझा हात.
डोक्यावर पदर, कपाळी कुंकू,
कशी भारणसुंद दिसत होती तुझी बायकु.
बायकोला होता मारत, घालून पाडून बोलत,
सोडीत नव्हती कधीही तुला जेव्हा तू होता नशेत.
घेतला निर्णय गेला तिला सोडून,
अर्ध्यावरती कशी रे काढील दिवस.
कोणावाचुन कोणाचे नाही बरं राहत,
ती बायको मात्र झाली खुप व्याकूळ.
गेलास असे काही बोलून,
आयुष्यभर सुखी राहणार नाही कुटुंब.
ती रात्र दिवस काढते तुझी आठवण ,
दारूच्या या व्यसनात तुझा जीव गेला रे फुकट.
