STORYMIRROR

Prathmesh Bansod

Others Children

3  

Prathmesh Bansod

Others Children

माझं पिल्लू

माझं पिल्लू

1 min
335

रंगाने सावळा वाणीने गोड,

मनाने मलुल असे त्याचे रूप


मोठ मोठ्या गोष्टी अन,

मोठी ती स्वप्न, 

पाहण्यात सदा असतो तो दंग


गाल त्याचे गुबगुब,

शरीर ही खूपच मऊमऊ, 

हृदयात त्याच्या प्रेमाचा फुटतो, 

पाझरच पाझरच


गोड गोजिरा माझा सोना,

गोड मटोला माझा राजा

कृष्ण सारखा नटखट जसा ,

प्रथमेश आहे तसाच माझा


आदर्श तसा गुण वान तो, 

सर्वांच्या मनावर राज करणारा तो.

खेळण्यात पारंगत,

मौजमस्तीत पहिलाच तो


क्रिकेट त्याचा आवडता खेळ तो,

मैदानात उतरताच सोसायटीत टाकतो दणाणून तो


नाही हा शब्दच नाही त्याच्यापाशी,

प्रत्येक कामासाठी मनापासून तयारी त्याची


गोड पदार्थ चा खव्या तो ,

समोसा तर मनाचा राजाच तो


गुणा बरोबरच अवगुण त्याच्यात,

पण झाकतात मासुम चेहऱ्याकडे बघतातच


माझ्या जिवाचा जीव की प्राण तो,

न दिसताच जीव होतो कासावीस


देवा तुझ्या हात नेहमीच राहू दे ,

माझ्या या बाळाच्या डोक्यावर



Rate this content
Log in