STORYMIRROR

Prathmesh Bansod

Others

2  

Prathmesh Bansod

Others

माय माझी

माय माझी

1 min
88

आई तुझ्याबद्दल लिहाव‌ तरी काय,

तू तर तेहतीस कोटी देवा हून महान.


नऊ महिने नऊ दिवस किती तू यातना सोसुनी,

आई मला पोटाला तू गं वाढवले.


कामाच्या त्या धावपळीत तुझ्या त्या

गर्भाला तू जपले.


खाण्यास नव्हते काही तरी तू मला जगवले, 

तुझ्या त्या चिमणी ला उडण्याचे पंख तु दिले.


तुझ्या महानते पुढे सगळे जग आहे फिके,

तळहाताच्या फोडाप्रमाणे ठेविले तु मले.


घासातला घास आई ठेविते काढून,

कुठे फेडू तुझे हे उपकार.


सासरचा होता तेव्हा तुला ही खूप जाचं,

तरीही तू न जुमानता मला ठेवले शाबूत.


जगातल्या महान आत्म्याला आई सर्वांनी नाव दिले ,

देवाच्या जाग्यावर आई मी तुला ठेविले.


तुझ्या प्रेमात नाही कोणताच स्वार्थ ,

त्यामुळेच आई तु सगळ्या जगात आहे महान.


तू आहे तोपर्यंत आहे माझी माहेरची वाट,

जगात कधीही सोडू नको मला तु एखलं .


 देवा माझ्या हि आईला दे माझे आयुष्य ,

कधी तोडू नको रे हि गुंफलेली गाठ.


आई माझी खूपच प्रेमळ ,मातृदिनाच्या दिवशी करते मी तुझ्या वर शुभेच्छांचा वर्षाव.


Rate this content
Log in