आई
आई
आई आई किती गं, हा तुझा खडतर प्रवास
या जगात, या जीवनात तुला कोणी समजू शकेल का?
का भाजतात तुझ्या आहारावरती सगळेजण पोळ्या
कधी तुला बसून विचारतील का
काय झालं ग तुला काम करून थकवा
आला असतील गं तुला का वाटत नाही
गं का म्हणून सोसते गं सगळ्यांचा फाजीलपणा
उघड डोळे, बघ एकदा जगाकडे
जग थोडे स्वतःसाठी बघ, शीतल वारा
बघ खुले आसमान, उड गं पक्षासारखे
घे ग मोकळा श्वास घे ग मोकळा श्वास
आई तुझी ही वेडी माया पडते ग
तुझ्या पाया तुझ्या पोटी जन्म हो
हीच माझी जन्मोजन्मी आशा.
