मी कधी मोजलेच नाही
मी कधी मोजलेच नाही
आयुष्याच्या तव्यावरती,
संसाराची पोळी भाजता भाजता,
हाताला किती बसले चटके,
हे मी कधी मोजलेच नाही
नवऱ्याच लेकराबाळा चे
करता करता मोठ्यांचा मान राखता राखता,
कितीदा मी वाकले,
हे मी कधी मोजलेच नाही
जरा चुकले की
घरच्यांची बाहेरची किती हो
बोलणी खाल्ली,
एकांतात बसून किती हो मी रडले,
हे मी कधी मोजलेच नाही
त्यांच्यासाठी फक्त आणि लेकरांसाठी,
आणखीन हो कुणासाठी जगता जगता,
स्वतःसाठी किती जगले,
हे मी कधी मोजलेच नाही
का मला
कोणी प्रेम करू शकत नाही ?
आई-वडिलांनी डोक्यावरचे,
ओझे कमी करण्यासाठी,
मला कळण्याच्या आतच,
त्यांचे आणि माझे प्रेम तोडले ,
तरीही मी हसत हसत सासरी आले
माझ्या जिवाचा किती हो आटापिटा झाले,
हे कधी मी मोजलेच नाही
सासरच्यांना माझे घर म्हणेन म्हंटलं,
पण त्यांच्यासाठी मी फक्त एक कामवाली,
लग्नाच्या अठराव्या वर्षीसुद्धा,
म्हणतात चल जा तू इथून,
खरंच ज्या घरात जन्म घेतला,
त्यांनी हसत हसत काढून दिले,
ज्या घरात अर्धे आयुष्य गेले,
त्यांनी रागारागात काढून दिले,
का ? मी हे कधीही मोजलेच नाही
