बाबा
बाबा
आईच्या या वेदने पुढे का विसरले बापाला
सांगा त्यांचे उपकार का विसरले सांगायला
आई होती घर माझं बाप त्याचा पाया
पायाच ढासळला तर घराचा होईल चुरडा
आईच्या व्यथा पुढे का विसरले बापाला
आईने नऊ महिने वाढवले मला गर्भ ला
आई विव्हळत होती वेदनेने
माझा बाप कोठे होता माझा बाप कोठे होता
हळूच देव म्हणतो तुझा बाप तुझ्यासाठी
माझ्याजवळ भीक मागत होता
का कळत नाही बापाचे महत्व
आई मागते सुखी ठेव माझ्या बाळाला
तर बाप मागतो माझेही आयुष्य दे त्याला..
आईच्या दुःखामध्ये नव्हते कोणी साथ
फक्त होता तिथे उभा माझा बाप
साथ होती बापाची म्हणूनच आईही लढली जगाशी...
आई भरवत होते मायेचा घास
त्या घासासाठी कष्ट करणारा होता माझा बाप होता
माझा बाप माझ्या लग्नाच्या दिवशी रडली माझी आई
आईचे रडणे दिसले
पण त्या बापाच्या काळजाचा आवाज का नाही ऐकला...
तो मनातल्या मनात रडत होता सुखी ठेव
माझ्या चिमणीला देवापाशी मागत होता देवापाशी मागत होता
आहे त्यांचे थोर उपकार का विसरली सांगायला
सुखी ठेव देवा म्हातारपणात माझ्या बापाला
आई आहे झरा तर बाप हा त्यावरचा पाण्याचा थरा पाणीच नसेल
तर आटेल तो झरा अभिमानाने सांगते .
बाप असेल जिथे मान मिळेल आईला तिथे
सशक्ती होती बालपणात आम्हा पाच भावंडांना
संसारात लागल्यावर कळाले बर का ती सक्ती नाही
तो तर मार्ग होता जीवन जगण्याचा मार्ग होता
जीवन जगण्याचा म्हणूनच टिकलो आम्ही या जगात
हे का विसरले सांगायला
आईच्या वेधणे पुढे का विसरले बापाला
दादा म्हणतो आम्ही बापाला .
दादा तुम्ही होतात म्हणून आला आमच्या जीवनाला आकार
का विसरले मी तुमच्याबद्दल सांगायला
आईच्या वेदने पुढे का विसरले बापाला.
