प्रेमाची परिभाषा माहिती आहे का
प्रेमाची परिभाषा माहिती आहे का
प्रेमाची परिभाषा माहिती आहे का तुम्हाला ?
व्याख्याच बदलून टाकली आजच्या या तरुणाईने
लग्नाच्या दुसऱ्याच वर्षी चाहूल लागे बाळाची
किती हो गोड आठवण त्या आई बापाची
नऊ महिने नऊ दिवस किती हो यातना सोसूनी
बाळ जन्मले त्या माऊलीचे, आनंद मावेना गगनात
किती थोर पुण्याई माझी, लक्ष्मी जन्मली दारी
तो बाप वाटे आनंदाची मिठाई दारो दारी
आनंदाचा पारावर मावेना हो गगनात
आजी-आजोबांचा तो उत्सव संप ता ही संपेना
जो तो बोले चिमणी किती गोड
पण अंगी तिच्या गुण होते हो धोंढ
चिमणी हो मोठी झाली, शाळेतून कॉलेजात उडू लागली
मंग न ती आईची झाली ना बापाची झाली
सगळेच ती लपवत गेली
सगळेच ती लपवत गेली
मंग न ती छोट्याची झाली, ना मोठ्यांची झाली
ती झाली मात्र प्रियकराची प्रेयसी झाली
सगळ्याच आशा-आकांक्षा वर पाणी सोडीत गेली
ती चिमणी आई बापाच्या प्रेमाचा घात करीत गेली
बचपन किती हो सूनहेरा
नाही केला त्या बहिण-भावाचा विचारही थोडा
तारुण्यातील हेही दिवस जातील तुझे निघुनी
तेव्हा समजेल बाळ तुला, माहेरचे घरटे मात्र जाईल तुझे उडुनी
प्रेम असते देण्याचे, आई-वडिलांच्या त्या कर्जाचे
आईच्या दुधाचे, बापाच्या कष्टाचे, त्या छोट्याशा बहिण भावाच्या मायेचे
बाकीच्या तर नात्यांचा काहीच नाही लावला तू मोल
जेव्हा समझेल तुला हा मोल, तेव्हा तुला कळेल तुझी दुनिया किती आहे खोल
तुझ्या प्रेमाचा विचार चूकला बरं
आई बापाला तू केले खूप व्याकूळ
दोन वर्षाचे प्रेम तुझे तू मोठमोठ्याने ओरडत राहिली
पंचवीस वर्षाची बेरीच मात्र तू ग चुकली
तू त्या बापाच्या कोणत्याच यादीत नाही बसली
त्यामुळेच तू प्रेमाची परिभाषा ही चुकली
त्यामुळे तू प्रेमाची परिभाषा ही चुकली
ढस ढसा रडे माय तुझी तुज पाशी
तरीही चिमणी न तिची ममता दिसली
तरीही चिमणी न तिची ममता दिसली
प्रेम नसते वाईट
पण प्रेमाची परिभाषाच तुला नाही ग माहित

