STORYMIRROR

Prathmesh Bansod

Inspirational

3  

Prathmesh Bansod

Inspirational

बालपण

बालपण

1 min
578

लाडाचे बालपण नसते, प्रत्येकाच्या नशिबी,

होते सक्तीचे पण होते थोडे मस्तीचे


हौस मोठी बालवया, झुक झुक गाडी त मामाच्या गावाला जायला


आजोळी जाऊन झोका तो झूल वायला,


झोका झुलता झुलता मामाच्या पोरी चे केस ओढायला


पुरण पोळी खाऊन ताटातच पाणी सांडायला ,


मामीचे ते मोठे मोठे डोळे पाहून आईच्या हाताचा एक धपाटा खायला


छोटी होते मी करीत नसे, कोणतेच काम, पांगून ठेवीत होते आईला एक दोन शिल्लक चे काम


शेतातच राहतो आम्ही ,त्यामुळे पशु पक्षांसोबत खास मैत्री च माझी


गाय माझी आनंदी, तिच्या पाठीवर बसून करते मी रोजच सवारी


कुत्रा माझा मोती सोबतच माझ्या खेळतो बाहुली बाहुली


माऊ मोठी गुबू गुबू झाडावर चढते माझ्या बरोबर


तेव्हा नवतीच कोणती सुख-सुविधा ,

पण बालवयात होती एक वेगळीच मजा‌


हौदा मध्ये पोहायला ,

आजीच्या गोष्टी ऐकायला ,

आईच्या हाताची भाजी भाकरी खायला,

सकाळ होताच फुलपाखरासारखे बागडायला ,

तो मोहळाचा मध चाखायला ,

चांदोबाचा फोटो बोटाच्या कॅमेरात टिपायला

वाटते आता जावे बालवयात,

आईच्या कुशीत डोके ठेवाया 

जगावे ते बालपण आपल्या या ईच्छाने,

नको कशाचीच ती धावपळ,

 नुसतेच असावे ते बालपण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational