STORYMIRROR

jaya munde

Inspirational

3  

jaya munde

Inspirational

बाप

बाप

1 min
215

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  आयुष्याच्या प्रवासात

  बाबा एक नाव असतं,

  आधाराच्या वास्तवाला

  अत्यावश्यक बळ असतं....


 बाबा म्हणजे आभाळ

 विशाल, निस्पृह नि भारदस्त,

 जीवनाच्या प्रवाहात

  त्यांच्यासह सजती क्षण मस्त..


 बाबांचं अस्तित्व जवळून

 निश्चलपणे अनुभवलेलं,

 ऊन-सावलीच्या पंखाखाली

 तटस्तपणे भारावलेलं.....


 काबाडकष्टातलं त्यांचं जगणं

 खूप काही शिकवून जायचं,

 यातनांचं आयुष्य सहजच

 महत्त्वाकांक्षा जागवून जायचं..


 खूप आहेत स्मृती त्यांच्या

 मनात घर करून बसलेल्या,

 क्षणाक्षणाच्या गाथा अशाच

 आसवातून ओघळलेल्या....


 त्याच्या झिजण्याचे कारण

 आमचं सुख असायचं,

 झिजलेल्या चपला पाहून

मन क्षितिजाला गवसणी घालायचं


घट्टे पडलेल्या हातांना वाटतं

 आतातरी सुखवावं,

आपल्या सुखाकरीता सोसलं 

आता मणभर ऋण फेडावं...


 सखींनो,बापाचं प्रेम फक्त

 सासुरवाशीनीला कळतं,

 त्याच्या आठवणीनं काळीज

 असाह्य होऊन तुटतं....


 ऐपत, इच्छा असूनही

 हात मात्र बांधलेले असतात,

 हुंदक्यांच्या संगीतातच

 क्षण सारे विरून जातात...

🌷🌷🌷🙏🙏🌷🌷


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational