बालिकादिन
बालिकादिन
बालिकादिनाचे महत्व
जाणा तुम्ही सारे जन
एकच दिन नसे तिचा
सदासर्वदा ठेवा जाण
बेटी असे धनाची पेटी
नका तिला हीन लेखू
मुलगा मुलगी समान
नका तिला मागे ठेवू
दीप पणती करती
काम प्रकाश देण्याचे
उच्चशिक्षित मुलीही
आधार आईवडीलांचे
उच्चशिक्षणासाठी
जाई मुलगा परदेशी
जपे लेक जीवापाड
काळजी घेऊन तयांची
उभय कुलांते उद्धारी
अशी असे तिची ख्याती
माया प्रेम सदा उरी
वात्सल्याचा झरा मनी
वासनांध नरपशू
उध्वस्त करती तिला
जीव जाई नाहक तिचा
वाचवा कोवळ्या बालिकेला
हो आता बालिके सबला
ज्युडो कराटे स्वसंरक्षणास
सर्व क्षेत्रात आघाडीवरी
स्त्रीजन्म लाव सार्थकास!!
