Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anil Chandak

Tragedy

5.0  

Anil Chandak

Tragedy

बाल शिक्षणाचा बाजार

बाल शिक्षणाचा बाजार

1 min
404



इथे साऱ्यांनी,वाट लावली,बाल शिक्षणाची!

राजकारण्यांनी,मांडलेल्या,शाळा बाजाराची!!1


जन्माला येण्यापुर्वी,नंबर लावावा लागतो!

भरमसाठ देणगीनेही ,तृप्त नाही होती!!2


उरावर बसे पालकांच्या, भुते शिक्षणाची!

एवढे करूनही ,भिती ती शाळा प्रवेशाची !!3


दप्तर,शाळा गणवेश,टाँय,बुट घालूनी!

इंग्लिश माध्यम,मातृभाषेला,चुना लावूनी!!4


शाळेत प्रवेशाने,खर्च थांबत कधी नाही!

स्कुल बसची,महामुर फी,बोकांडी ती राही!!5


मुद्दा हा,कळीचा झाला,प्रत्येकजण ग्रासला!

अरेरावीने,साध्या शिक्षणांसही महागला!!6


बचतीचे बेत ,महिन्या अखेरी कोसळती!

शिक्षण द्यावे कसे, मुलांना हे प्रश्न पडती!!7


मुलभूत हक्कांचाही,बोऱ्या वाजला या इथे!

गोर गरिबांचेही, शिक्षण दूर झाले इथे !!8


शाळेतल्या शिक्षकांची, शिकवणीसही सक्ती!

धूंदी आली, सर्वांना, मस्तवाल जबरदस्ती!!9


शिक्षणासाठी, पालकांनीच माघार घ्यायची!

लाचारी, पत्करावी लागे, नमुन रहायची !!10


जिल्हा परिषद,शाळेतले, शिक्षण चांगले!

इंग्रजी, जाचापासून, दुर रहाण्यात भले!!11



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy