बाकी सारंच ठीक आहे..
बाकी सारंच ठीक आहे..
बाकी सारंच ठीक आहे..
हो.. कधी कधी तुझी
खूप आठवण येते
मग खूप काही लिहावंसं वाटत
अगदी मनातलं सगळंच तुला सांगावस वाटत..
बाकी सारंच ठीक आहे..
फक्त प्रत्येक मिनटं तुझ्या
प्रेमात वर्ष वाटू लागतं
आणि तू नसल्याची
जाणीव करून देतं..
बाकी सारंच ठीक आहे..
फक्त जेव्हा केव्हा कविता लिहिते
तेव्हा कंठ दाटून येतो
आणि सारे शब्द मनातच थांबवून घेतो..
बाकी सारंच ठीक आहे..
पण आजकाल यमक काही जुळत नाही
प्रत्येक कविता अजाण वाटू लागते आणि
भावना निरर्थक वाटू लागतात..
कारण....
बाकी सारंच ठीक आहे..
फक्त तू नाहीस...