STORYMIRROR

Nutan Pattil

Classics

4  

Nutan Pattil

Classics

बागेत फिरताना

बागेत फिरताना

1 min
221

बागेत फिरताना सख्या

साथ तुझी हवी!!

मी तुझी प्रिया

प्रीत आपली नवी नवी!!


बागेत फिरताना दिसला

सुंदर नजारा मजला!!

मोगऱ्याचा ताटवा फुलला

जीव माझा सजला!!


रंगीबिरंगी फुले शोभती

सुंदर या बागेत!!

सकुलंट ही नयनरम्य

लावले छोट्या जागेत!!


सुंदरश्या पाम ट्रीने

सजली बाग मोहक!!

मनी प्लांटची दाटी 

धुरांडाची नक्षी सुबक!!


रंगबिरंगी बागेतील ही फुले

विलोभनीय वाटे डोळ्यांना

नाना रंगसंगती पाहून तयांची

फुलपाखरांचा हेवा माणसांना


फूल कोमल सुंदर हे

गुलाबाचे मनमोहक!!

बागेमध्ये शोभून दिसते

सृष्टी वाटे ही आकर्षक!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics