बाबा
बाबा
बाबा मला तुम्ही मिळाले
भाग्य माझं उजाळलं
तुमच्यामुळे मी माझं
स्वत:च अस्तित्व घडवलं..!
तुमचे उपकार माझ्यावर
मी किती तरी सांगणार
देवापाशी सदैव मी
बाबा तुम्हालाच मांगणार..!
जसा तो कुंभार घडवतो
आकार देतो मडक्याला
तसचं शिकवून तुम्ही
लहानाचं मोठ केलं मला..!
नसेल परिस्थिती आपली
पण शिक्षण मात्र दिलं
तुमच्यासारखे बाबा दिले
मला सर्वस्व मिळालं..!
तुमच्यामुळे ओळख माझी
मला तुमचा आहे आधार
तुमची मुलगी म्हणून मी
स्वप्न करणार तुमचं साकार..!
