STORYMIRROR

Prashant Shinde

Action Classics Inspirational

3  

Prashant Shinde

Action Classics Inspirational

बाबा महाराज सातारकर

बाबा महाराज सातारकर

1 min
129

सव्वीस ऑक्टोबर 2023..!

सुप्रसिद्ध कीर्तनकार मा. बाबामहाराज सातारकर यांचे ८९ वर्षी निधन झाल्याचे समजले आणि अंतरतला देवभाव हेलावला.

मधुर वाणी,नीटनेटकी वैचारिक मार्मिक आणि समर्पक बोधामृताने ओजस्वी रसाळ ओघवती मधाळ शब्दगंगा म्हणजे बाबा महाराजांचे अविस्मरणिय असे कीर्तन...

लहानपणापासून ही शब्दगंगा जी कानात शिरली ती सरळ हृदयात स्थानापन्न झाली ती आजही तशीच आहे.ज्या योगे अनेकांचे जीवन खरोखरच भक्तिमय आणि प्रसन्नचित्त झाले.

अशा हृदयस्थ महाराजांच्या चरणी भावपूर्ण 

काव्यसुमानांजली.....


मा झे दैवत अंतरीचे हरवले

बा बा तुम्ही असे का हो केले?

बा बा आपण असे अचानक

म ध्येच का हो आम्हा टाकले...?


हा जन्म सुरेख सुंदर

रा जासम जगण्यास तुम्ही लावले

ज रा वेळ काढुनी माऊलीस आळवणे

सा ध्या पद्धतीने आम्हा शिकविले..


ता रतम्य राखुनी जीवनी

र ममाण नामात होण्या सांगितले

क र्मकांड बाजूस सारुनी सारे

र सरशीत प्रसन्नचित्त राहणे दाखविले..

 आपल्या अमूल्य मार्गदर्शनाने

 जीवन आमचे सौख्यमय की हो झाले

 उतराई होणे शक्य नसे आम्हा म्हणोनी

 भावयुक्त काव्यपुष्प हे आपल्या चरणी वाहीले..!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Action