बाबा घरी या ना
बाबा घरी या ना
अलगद उचलून गोड पापा मला द्या ना।
बाबा तुमची आठवन येते घरी या ना।।धृ।।
फोनवर रोज बोलता
का घरी येत नाही।
गवतावर खेळायला
बागेत नेत नाही।।
छकुली मी तुमची माझे लाड पुरवा ना।।१।।
खाऊ मागनार नाही,
नको चाँकलेट।
महागडा ड्रेस नको,
हवी तुमची भेट।।
मी रोज बाबा-बाबा करते ,काळजी माझी घ्या ना।।२।।
गोष्ट सांगयला इथे
आबा नाही न आजी।
अभ्यास कितीही केला
तरी आईची नाराजी।।...
हरवले बालपण मला तेच परत द्या ना ।।३।।
