STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

4  

Meenakshi Kilawat

Inspirational

अतूट बंधन

अतूट बंधन

1 min
205

अतूट बंधन*

साथ सोडेना कधीही

जगी अतूट बंधन

संगसाथ दोघे राही

श्वास आणि अंतर्मन।।१।।

बाळ आईला प्रियती

वात्सल्याची असे खान

माय लेकराची माया

वाही नातीच महान ।।२।।

बंधनात अखंड सृष्टीही

भार मोठा उचलोनी

करे कृतार्थ जगास

देते करूना भरूनी ।।३।।

क्षुधारस जगण्यास

निसर्ग देतो भरूनी

नाते अतूट बंधनाची

संचारते या जीवनी ।।४।।

नदी सागराचे नाती

गोड घेवूनीया पाणी

एकजीव होती दोघे

देती मीठाची ही देणी।।५।।

ठेवी अपुल्याच अंगी

माया चंदन वृक्षाची

जगी साऱ्यांना देतसे

देणी गंध सुंगधाची ।।६।।

गुण दोष सारखेच

हार जीत ही सोबती

भास असे पुढेमागे

पण अतूट ही नाती ।।७।।

आधी दिवस निघतो

मग रात्र होत असे

प्रेमापोटी चालतांना

जीवलग नाते जसे ।।८।।

©®

मीनाक्षी किलावत

  8888029763


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational