अट्टाहास !
अट्टाहास !


अट्टाहास असावा
नेहमीच सूंदर दिसण्याचा
नवे नवे कपडे घालून
नटून थटून मुरडण्याचा
नियमित व्यायाम करून
शरीराने सक्षम असण्याचा
अट्टाहास असावा
निटनेटकेपणाचा
अचूक प्रसाधन वापरून
सौंदर्यात भर घालण्याचा
टापटीप राहून
सदैव प्रसन्न राहण्याचा
अट्टाहास असावा
वक्तशीरपणाचा
योग्य नियोजन ठेवून
कामे पूर्ण करण्याचा
क्षणांची किंमत ओळखून
वेळेचा सदूपयोग करण्याचा
अट्टाहास असावा
प्रामाणिकपणाचा
विचार असावा मनात
सचोटी व नितीमत्तेचा
सत्याची कास धरून
सात्विक सदाचारी होण्याचा
अट्टाहास असावा
समंजसपणाचा
परोपकाराची साथ घेऊन
नव्या वाटेवर चालण्याचा
भेदभाव दूर सारून
सुशील माणूसकी जपण्याचा
अट्टाहास असावा
निरागसतेचा
मृदु मुलायम भाषेत
सुसंवाद साधण्याचा
प्रेमळ अल्लड बालपणात
पुन्हा पुन्हा रमण्याचा
अट्टाहास असावा
देश भक्तीचा
राष्ट्र वीरांचे स्मरण करून
त्यांचे पोवाडे गाण्याचा
मातृभूमीचे ऋण ओळखून
देशा साठी समर्पण देण्याचा