STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

अठ्ठावीस मार्च

अठ्ठावीस मार्च

1 min
465

नव्या संकल्पासह चौथ्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली सकाळी सकाळीच रामायणाची धून कानी पडली... आणि पूर्वीच्या प्रसारणाच्या साऱ्या आठवणी एक एक करून आठवू लागल्या त्यातली एक बोलकी असनी दुर्मिळ आठवण आजुनही घर मनात आहे त्यामुळेच रामायण आम्हाला चांगलेच ज्ञात आहे... महिनोंमहिने चालणारी ही मालिका आनंदाने सारे पहायचे पाहताना TV च्या पेटीलाही मनोभावे पुजायचे रामायणाचा भाग सम्पला की आरती करायचे प्रसाद ही वाटायचे.. आता आठवले की त्या निर्मळ पापभिरू स्वभावाचे खरोखरच नवल वाटते आणि जुने ते सोने हे पटते एकदा असेच झाले इंगळ्याचा बाळू ही दूरदर्शनवर मालिका पाहण्यास आला सीतामाई स्क्रिनवर दिसताच बाळू अनाहूतपणे पुटपुटला अण्णा काय बाडी बघा हाय तश्शी हाय... सारेच हसू लागले हसता हसता रडू लागले कारण सीतामाई वनवासात जात होत्या आजही तो प्रसंग जसाच्या तसा डोळ्यासमोर तरळतो आणि बाळू इंगळ्याच्याही डोळ्यात पाणी आणतो....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational